#Business_coaching
#Lock_Down_आणि_आपण !
📌 पंतप्रधान मोदींनी 21 दिवसाचं Lock Down जाहीर केलं आणि भय , चिंता, काळजी या सर्व भावनानी पूर्ण मार्केटला कवेत घेतलय , अशा परिस्थितीत काय करणार कसं करणार , पुढे काय होणारंय ?या आणि अशाच अनेक प्रश्नांनी मार्केटला वेढा घातलाय .
📌 पण ही काही पहिली विषम परिस्थिती नाहीये आणि ना ही शेवटची त्यामुळे एक उद्योजक म्हणून आपण आपल्या मनाचे दोर हातात पक्के धरून ठेवावे लागणार आहेत कारण परिस्थिती ही Bad पासून worst कडे जातेय .
📌 आपल्याला स्वतःला मजबूत व्हावे लागेल , अजुन पक्कं कसं होता येईल हेच बघायचय ,
📌 दरवेळी आपण आपल्या लेखांतून प्रॅक्टीकली वापरता येतील अशाच स्ट्रॅटजी सांगतो , आज पण त्याचांच आधार आहे .
📌 जग फार वेगाने बदलतय आणि प्रचंड खळ्बळ उडवून देणारे बदल हीच या जगाची नवीन रिअॅलिटी आहे .
*(1) Get New skill sets* :
आजच्या या कठीण काळात आपल्याला जाणवत असेल कि , आपल्या अंगात असणाऱ्या जुन्या स्कीलसेटचा काही फायदा नाही होतंय , कारण 30/35 वर्ष काम करून रिटायर होण्याचे दिवस गेलेत , त्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेला _ "जॉब इकॉनॉमी " म्हणतात ज्यात तुम्ही किती वेळ काम केलं यावर पैसे मिळायचे , आता या " रिजल्ट बेस इकॉनॉमी " मध्ये आपण काय रिजल्ट देतोय यावर आपलं भविष्य अवलंबून रहाणार आहे , त्यामुळे ज्या स्कीलला मार्केट मध्ये मागणी आहे त्या शिका , एकाच कंपनीकरिता आयुष्य भर काम करण्याऐवजी स्किल्स च्या जोरावर फ्री लांसर म्हणून काम करा फायद्यात रहाल .
या लॉक डाऊन चा फायदा घ्या .
📌 *(2) Double Your learning*
सध्या वेळ आहे , इंटरनेट आहे , 4G connection आहे , जास्तीत जास्त Educational content वाचा , शिकायची जगाच्या पुढे जायची हीच वेळ आहे , जेंव्हा सगळ्यांचीच स्पीड स्लो होऊन जाईल , तेंव्हा आपण तयारी करत रहा !
यामुळे जेंव्हा सगळं काही वातावरण व्यवस्थित होईल त्यावेळी आपण जास्त तयार असाल .
📌 *(3) Expand dont Contract:*
इतिहास साक्षीदार आहे कि ज्या ज्यावेळी सगळं जग अगदी गोठून गेलं होतं ( freeze झालं होतं ) त्या त्या वेळी उद्योजक जास्तीचे अॅक्टीव झाले होते ,
D-mart , IBM , Microsoft , Disney , General Motors या कंपन्या आर्थिक मंदीच्या काळातच मोठया झाल्यात .
आता हे करणे इतकं सोपं नसलं तरी अवघड नाहीये .
स्वतःला एकच प्रश्न विचारत चला , " मी माझे उत्पन्न डबल कसं करू शकतो , ते पण 50%चं साधनं वापरून उत्तरं मिळतील.
📌 *(4) Overcommunicate*:
जेंव्हा सगळं जग पैनीक मोड मध्ये असतं त्यावेळी एका स्ट्राँग व्यक्तीची त्यांना गरज असते , वारंवार जो त्यांना गायडन्स करेल ( 120 तासात पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा आज राष्ट्राला संबोधलं ) तसंच आपल्या व्हेंडर , रिटेलर्स , कर्मचारी , फैमिली मेंबर्स यांच्या बरोबर एरवी पेक्षा जास्त कम्युनिकेशन करायला चालू करा , त्याने उद्या फायदा होईल !
📌 *(5) Cut your Losses & Venture different* :
आता जास्त मोकळा वेळ आहे , आपल्या व्यवसायाबद्दल जास्तीचा विचार करण्यासाठी , लौक डाऊन मार्केटला आहे , आपल्या दिमागाला नाही , सगळ्या गोष्टींचा बुडातून विचार करा , कुठं चुकतय ? काय चुकतंय ? नुकसान कुठे होतंय ?या प्रत्येक बाबीचा बारकाईने विचार करायला चालू करा , तेंव्हा वेळ नव्हता पण आज आहे म्हणून आपल्याला खूप पॉईटंस कळतील , जसं घरातला सगळा पसारा काढला कि उंदराचे बीळं सापडतात तसं होईल ते काम .
जर असं वाटलं कि , आत्तापर्यंत चाललेलं काम पुढे चालणार नाही , तर मग पटकन दुसरा पर्याय अभ्यासायला घ्या , कारण एकच बिझनेस आयुष्यभर करावा असं कुठेही लिहिलेलं नाही .
📌 *(6) Dont get Emotional*
हे दिवसं आपली परिक्षा बघणार आहेत , इमोशनल होत बसू नका , कारण आपल्यावर आपले कूटूंब , कर्मचारी , व्यवसाय सगळंच आधारलेलं आहे , आपणच जर बावळ्यासारखं परेशान झालो तर त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचय ?त्यामुळे Cool , calm रहा !
📌 *(6) Why Me?*
जेंव्हा जेंव्हा परिस्थिती वाईट येते , त्यावेळी आपला फार फेवरेट प्रश्न असतो ,,, " माझ्याच नशिबी का हे? ''
बदला रे परिस्थिती बदलणार नाही प्रश्न बदला !
" माझ्याच नशीबी का " ? याच्या ऐवजी , "मी यातून काही शिकून प्रगती करू शकतो का ? हे विचारा " !
📌 *(7) Prepare your family for future Problem*
आज हा कोरोना आलाय , 21 दिवस लॉक डाऊन झालय ! अजुन एका व्हायरस ची आहट लागलीये म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबियाचं संरक्षण करावंच लागणारंय , जमलं नाही तरी त्याची प्लानींग करायला घ्या !
त्यासाठी आज वेऴ आहे .
कारण .... " आज जरी आपल्याला मजबूरीने सेपरेट बसवलं असलं (Social distancing) तरिही उद्या आपली एकी वाढणारंय !
फक्त स्वतःची काळ्जी घ्या ! आणि या जबरदस्तीच्या सुट्टीचा वापर स्वतःला मजबूत करण्यासाठी करा ! घायाळ होऊ नका ! घायाळ टायगर चांगले वाटत नाहीत !
उभे रहा !
आमचे फेसबूक पेज वाचत रहा ! आम्ही चांगले चांगले कन्टेन्ट देत राहू !
पेज लाईक करा !
https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890
शुभेच्छा
© निलेश काळे
उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट
ब्लॉक 2 & 3 , Mazda Apt .
आनंद पार्क , औंध , पुणे .
9518950764
आपल्याला पर्सनल Business Consulting हवीये किंवा उद्योग नितीच्या स्पेशल पेड व्हाट्स अप कोर्सला जॉईन करायचंय ? संपर्क करा
office:
ओम केश मुंडे : 9146101663